Ad will apear here
Next
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात अँजिओग्राफी शिबिर
सावंगी (वर्धा) : आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाने चार आणि पाच ऑगस्ट रोजी हृदयरोग अँजिओग्राफीचे भव्य शिबिर आयोजित केले आहे. हृदयरोग, हृदयाच्या झडपेचे आजार, छाती दुखणे, धाप लागणे, चक्कर येणे, पायावर सूज येणे, रात्री झोपेत दम लागणे, उच्च रक्तदाब यांसारखे आजार असणाऱ्या व्यक्ती या शिबिरात सहभागी होऊ शकतात. त्यांना एक हजार नऊशे ९९ रुपयांत अँजिओग्राफी करून घेता येईल. 

शिबिरात अँजिओग्राफीसंदर्भातील चाचण्या विनामूल्य करण्यात येतील. तसेच हृदयरोगतज्ज्ञांकडून विनामूल्य तपासणी करून घेता येईल. रुग्णांसाठी राहण्याची व भोजनाची सोय मोफत उपलब्ध असेल. 

शिबिरात सहभागी होण्यासाठी पाचशे रुपये नोंदणीशुल्क भरून आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. रुग्णांनी शिबिरात नियोजित तारखेआधी एक दिवस भरती व्हावे व उर्वरित रक्कम १४९९ रुपये त्या वेळी जमा करावी असे आयोजकांनी कळवले आहे.
 
शिबिर स्थळ : 
हृदयरोग बाह्यरुग्ण विभाग नं. २२, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे), वर्धा 

नोंदणीसाठी संपर्क : 
वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया - प्रतीक गडकरी : ७५८८१ ७८१७८
अमरावती, अकोला, बुलडाणा - महेंद्र मोहोड : ९९२३९ ९१५८०
यवतमाळ, वाशिम - मनोज महाजन : ८८५६० ०९५५७
चंद्रपूर, गडचिरोली - सत्यजित पोद्दार : ९४०४५ ३६६२४
प्रणय मुळे : ९१६७३ ६५००६
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZWUBF
Similar Posts
सावंगीच्या दंत रुग्णालयाचा उपक्रम सावंगी (वर्धा) : येथील शरद पवार दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या रौप्यमहोत्सव पूर्तता वर्षानिमित्त एक महिना विशेष मुखआरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना एक ते ३० जूनपर्यंत मोफत व सवलतीच्या दरात विशेष दंततपासणी व उपचार सेवा उपलब्ध होणार आहे. या तीस दिवसीय अभियानात दात स्वच्छ
पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी ४४ हजार ईव्हीएम, २० हजार व्हीव्हीपॅट यंत्रे सज्ज मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघामध्ये ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान होत आहे. आठवडाभरावर आलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण ११६ उमेदवार आहेत. सात मतदारसंघात १४ हजार ९१९ मतदान केंद्रे आहेत, तर एक कोटी ३० लाख ३५ हजार मतदार आहेत
‘अंगणवाडी केंद्राची संख्या वाढविणार’ वर्धा : ‘वर्धा जिल्ह्यासह अनेक ठिकाणी नवी अंगणवाडी केंद्रे स्थापन करण्याबाबत राज्य सरकार कार्यरत आहे. राज्य सरकारांना एक डिसेंबर २०१४च्या पत्रानुसार अंगणवाडी केंद्रे पुनश्च सुरू करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे,’ अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी लेखी उत्तरातून खासदार रामदास तडस यांना दिली
क्रीडा धोरण अंमलबजावणी समितीवर रामदास तडस यांची नियुक्ती महाराष्ट्र सरकारने राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रसार व जोपासना करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती २९ जुलै रोजी स्थापन केली आहे. वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार, तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष रामदास तडस यांची या समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language